श्री देवी भराडी ही आंगणे कुटुंबीयाची देवता. ती तुळजाभवानी मातेचा अंश आहे, असा आंगणे कुटुंबीयांचा द्दढ विश्वास आहे. आंगणे कुटुंबीयांनीच देवीची स्थापना करून आंगणेवाडीत देवीचे मंदिर बांधले. सुरुवातीला मंदिर कौलारू आणि लाकडी नक्षीकाम असलेले होते. आंगणे कुटुंबीयांनी स्वत:च्या उत्पन्नाचा काही हिस्सा बाजूला काढून या मंदिराचे नूतनीकरण केले. या नूतनीकरणाची सुरुवात दिनांक रोजी भुमी पूजनाने करण्यात आली आणि दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सुवर्ण कळस बसवून मंदिर नूतनीकरण पूर्णत्वास नेले.हा कळस सोहळा पांच दिवस चालू होता.आता हे धांगद्रा दगडाने बनविलेले मंदिर,संगमरवरी दगडाने (मार्बलने) बनविलेले सभागृह आणि सभोवतालचे कुंपण यामुळे हा मंदिर परिसर फारच नयनरम्य वाटतो. त्याचमुळे श्री देवी भराडी मातेचे दर्शन घेण्याबरोबरच हे मंदिर पहाण्यासाठी पर्यटक आंगणेवाडीस भेट देतात.
आंगणेवाडीतील श्री देवी भराडी देवस्थान हे आंगणे कुटुंबीयांचे खाजगी देवस्थान.संपूर्ण पंचक्रोशीत श्री देवी भराडी नवसाला पावते, अशी जनमाणसात धारणा आहे,श्रध्दा म्हणा हवं तर. दरवर्षी आंगणे कुटुंबीय देवीचा वार्षिक उत्सव आंगणेवाडीत थाटामाटात साजरा करतात. आंगणे कुटुंबीयांचे हे खाजगी देवस्थान असल्याने आंगणे कुटुंबीय न चुकता या वार्षिकोत्सवात मोठ्या संख्येने सामील होतात. पूर्वीच्या काळी वाहतुकीची पुरेशी साधने उपलब्ध नव्हती त्यामुळे मुंबई, पुणे आणि इतरत्र कामधंद्या निमित्ताने गेलेले आंगणे कुटुंबीय आणि लग्न होऊन सासरी गेलेल्या आंगण्यांच्या लेकी या सर्वांना वर्षातून एकदा एकाच दिवशी एकत्र येण्याची संधी उपलब्ध व्हावी,म्हणून आंगणेकुटुंबीयां कडून या वार्षिकोत्सवाचे आयोजन केले जाते.
श्री देवी भराडी माता ही पाषाण रूपात आहे.परंतु वार्षिकोत्सवाच्या दोन दिवसात ती मुर्ती रुपात असते. वार्षिकोत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटे देवीच्या मुर्तीला नवीन शालू-चोळी नेसवली जाते, सोन्याचे अलंकार परिधान केलेली, सुवर्ण मुकुटधारी भराडी देवी मूर्ती स्वरूपात सुहास्य वदनाने यात्रेकरूंना दर्शन देण्यासाठी सज्ज होते.
मंदिर आणि परिसर फुलांनी सजविला जातो.मंदिर रोषणाईने उजळून निघते. मंदिर नाही तर संपूर्ण आंगणेवाडीत घरोघरी रोषणाई केली जाते.त्यामुळे श्री देवी भराडी मातेचा वार्षिकोत्सव हा आंगणेकुटुंबीयांचा वार्षिक सण आहे, असे प्रतीत होते.
आपल्याला आमच्या मंदिर आणि निधीसमितीच्या ताज्या अपडेट्सबद्दल सूचित राहा.
जर आपल्याला मंदिर किंवा ट्रस्टशी संबंधित कार्यक्रमांसाठी दान करायचं असेल तर येथे क्लिक करा.
Donations are vital for the upkeep of the temple, the performance of sacred rituals, and the provision of community
services.